थोपटेंच्या 45 वर्षांच्या गडाला सुरुंग लावत जायंट किलर ठरलेले शंकर मांडेकर कोण?

149 0

नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 288 विधानसभा साठी झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना सहन करावा लागला. संग्राम थोपटे यांना पराभूत करत शंकर मांडेकर हे ‘जायंटकिलर’ ठरले आहेत. संग्राम थोपटेंचा पराभव करणारे शंकर मांडेकर नेमके कोण आहेत पाहूया स्पेशल रिपोर्ट मधून..

1972 पासून ते 2019 पर्यंत केवळ 1978 आणि 1999 चा अपवाद वगळता थोपटे परिवाराचं वर्चस्व राहिल्याचा पाहायला मिळालं होतं.
1972 मध्ये संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे आमदार झाले 1978 मध्ये राष्ट्रवादीच्या संपतराव जेधे त्यांना पराभूत केलं. त्यानंतर 1980 ला पुन्हा अनंतराव थोपटे आमदार झाले त्यानंतर 1985 व 1990 या दोन्ही पंचवार्षिक मध्ये अनंतराव थोपटे हे आमदार झाले मात्र 1999 ला पुन्हा राष्ट्रवादीच्या काशिनाथ खुटवड यांनी त्यांचा पराभव केला. 2004 मध्ये पुन्हा अनंतराव थोपटे आमदार झाले त्यानंतर 2009 2014 आणि 2019 या तीनही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार झाले त्यानंतर आता 2024 च्या निवडणुकीत शंकर मांडेकरांनी संग्राम थोपटे यांचा पराभव करत थोपटे पिता पुत्रांच्या गडाला सुरुंग लावला. मूळचे पहिलवान असणारे शंकर मांडेकर यांनी मुळशी तालुक्यातील चांदे गावच्या सरपंचपदापासून आपले राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य बनले. शंकर मांडेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख होते मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि अजित पवारांनी त्यांना लगेचच भोर वेल्हा मुळशी विधानसभेचे तिकीट दिलं. आणि त्यांनी संग्राम थोपटे यांचा 19638 मतांनी पराभव केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!