महाराष्ट्राच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अभिनेता एजाज खान यानी आझाद समाज पक्षाच्या (कांशीराम) तिकिटावर निवडणूक लढवली होती. बिग बॉस 7 फेम एजाज खान याला पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांचे समर्थन मिळाले होते. मात्र, या निवडणुकीत एजाज खान याला केवळ 146 मतं मिळाली.
विशेष म्हणजे, एजाज खान याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठे फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 5.5 मिलियन, तर फेसबुकवर 4.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर लोकप्रियता असूनही निवडणुकीत तो प्रभाव पाडू शकले नाहीत.
या मतदारसंघात भाजपचे भरत लव्हेकर यांनी 50,000 हून अधिक मते मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेचे (ठाकरे गट) हरून खान यांना 40,000 च्या आसपास मते मिळाली. हरून यांनी 32,499 मते घेतली, तर भारती लव्हेकर यांना 25,643 मते मिळाली. या निवडणुकीत भाजपने वर्सोवा मतदारसंघात आपला विजय नोंदवला.