विधानसभा 2024: पुण्यात सत्ता कुणाची ? काय सांगतायत एक्झिट पोल

महाविकास आघाडी की महायुती; ‘पॉलिमेट्रीकस’चा नवा ‘एक्झिट पोल’ आला समोर

165 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडला असून महाराष्ट्रात मागील 30 वर्षातील सर्वाधिक म्हणजे 65.11% मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार असून अनेक संस्थांनी एक्झिट पोलद्वारे राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

सर्व प्रमुख संस्थांच्या एक्झिट पोल नुसार राज्यात महायुतीचा सरकारी येईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच आता ‘पॉलिमेट्रीकस’ या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला आहे या एक्झिट पोल मध्ये देखील महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला असून महायुतीला 164 तर महाविकास आघाडीला 112 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

‘पॉलिमेट्रीकस’च्या एक्झिट पोलचा काय आहे अंदाज? 

महायुती: 164

भाजपा: 97

शिवसेना: 32

राष्ट्रवादी: 33

राष्ट्रीय समाज पक्ष: 01

जेएसएस: 01


महाविकास आघाडी: 112

काँग्रेस: 46

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे: 34

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार: 27

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी: 02

शेतकरी कामगार पक्ष: 02

समाजवादी पार्टी: 01


अन्य प्रमुख कोणत्या संस्थांच्या एक्झिट पोलचा काय अंदाज?

‘प्राब’ संस्थेच्या ‘एक्सिट पोल’नुसार कुणाला किती जागा मिळणार?

महायुती : 151

भाजपा : 99

शिवसेना : 33

राष्ट्रवादी : 19

महाविकास आघाडी: 121

काँग्रेस : 36

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे: 38

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार: 47

मॅट्रिक्सने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 89 ते 101 शिंदेंच्या शिवसेनेला 37 ते 45 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 17 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस पक्षाला 39 ते 47 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 35 ते 43 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21 ते 39 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीस या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल नसार भाजपाला नव्वद हुन अधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 हून अधिक जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 22 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाला 63 आणि त्याहून अधिक राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाला 40 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर इतरांना सहा ते आठ जागा मिळतील असं सांगितलं गेलंय

Share This News
error: Content is protected !!