सीसीटीव्ही तपासा, आयोगकडून चौकशी होऊ द्या

76 0
  1. वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठीफोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावरस्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलतहोतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजनविकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख मा. हितेंद्र ठाकूर यांना फोन केला आपल्या पक्षाच्याकार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. मा. हितेंद्र ठाकूर . क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावरत्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपाकार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यासंदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. मा. राहुल गांधी मा. सुप्रिया सुळे अशायासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत मा. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशीव्हावी.
Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!