ती टीप भाजपमधूनच…; हितेंद्र ठाकूर यांचा मोठा गौप्यस्फोट

113 0

विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे.

यावेळी हितेंद्र ठाकुर यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी पाच कोटी रुपये घेऊन विवांतामध्ये आल्याची टीप भाजपामधूनच आल्याचा गौप्यस्फोट ठाकुर यांनी केला.

भाजपामधील एका मित्राने ही माहिती दिल्याची माहिती ठाकुर यांनी दिली. यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर हे प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती तावडेंनी केल्याची माहिती हितेंद्र ठाकुर यांनी दिली. त्यावर तावडे यांनी चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!