TMKC: जेठालालने पकडली निर्मात्यांची कॉलर; अखेर मालिकेतील सदस्यांनी दिलं स्पष्टीकरण

266 0

छोट्या पडद्यावरील सुपरहिट शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण असं की शोमधील सगळ्यांचा आवडता जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि शोचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यात सेटवर झालेल्या वादांच्या चर्चामुळे.

चर्चेनुसार,दिलीप जोशी आणि असितकुमार मोदी यांच्यात सुट्ट्यांबाबत बोलताना वाद झाला होता. दिलीप जोशी यांना सुट्ट्यांवर चर्चा करायची होती,पण असितकुमार मोदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाद वाढला असं बोललं जातंय. काही लोक म्हणत आहेत की, या वादाच्या वेळी दिलीप जोशी यांनी शो सोडण्याची धमकीही दिली होती.

मालिकेतील इतर कलकरांची प्रतिक्रिया

पण, मालिकेतील इतर कलाकारांनी या सर्व चर्चांना खोटं ठरवलंय. मंदार चांदवडकर (भिडे) म्हणाले, “ थोडे फार वादविवाद सगळीकडेच होत असतात, आम्ही सेटवर मजेत शूटिंग करत आहोत.” अमित भट्ट यांनीही यावर बोलत म्हंटल की, अशी काहीच गोष्ट नाहीये. सर्वांनी एकमताने सांगितलं की, दिलीप जोशी आणि असितकुमार मोदी यांचं नातं छान आहे. सगळं सुरळीत आहे.

Share This News
error: Content is protected !!