रोड शो दरम्यान छातीत दुखू लागल्याने मुंबईला परतला गोविंदा; दुसऱ्याच दिवशी प्रचारासाठी पुन्हा हजर

190 0

पाचोरा येथे शनिवारी शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या अभिनेता गोविंदाला छातीत दुखू लागल्यामुळेकार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईला परत जावं लागलं. पण, रविवारी ते पुन्हा जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे रोड शोसाठी हजरराहिले आणि सगळीकडे त्यांचं कौतुक आणि उत्साहाची चर्चा सुरु झाली.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी गोविंदा शनिवारी हेलिकॉप्टरने जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यांनी मुक्ताईनगर आणिबोदवडमधील रोड शो पूर्ण केले. पण पाचोरा येथे पोहोचल्यावर त्यांना छातीत दुखू लागलं, त्यामुळे त्यांना पुढचा कार्यक्रम रद्द करूनमुंबईला जावं लागलं.

यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंता दिसू लागली होती. पण गोविंदाने सार्वजनिकरित्या माफी मागत रविवारी राहिलेला कार्यक्रम पूर्णकरणार असल्याचं सांगितलं. ठरल्याप्रमाणे रविवारी त्यांनी कासोदा येथे रोड शोमध्ये भाग घेतला. या रोड शोमध्ये गोविंदालापाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

कार्यक्रमात त्यांनी आपल्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध संवादहटा सावन की घटासादर करून चाहत्यांची मनं जिंकली. त्यांच्या याउपस्थितीमुळे शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचाराला उभारी मिळाली. गोविंदाच्या सहभागामुळे मतदारांमध्येही चांगलीचर्चा सुरू असून उर्वरित प्रचाराला रंगत येण्याची अपेक्षा आहे.

Share This News
error: Content is protected !!