Top News Marathi Logo

गिरिश ओकने मतदारांना विचारले दोन “भाबडे प्रश्न” जेष्ठ अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

128 0

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलं आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्यामुळे प्रचार जोरदार सुरु आहे. निवडणुका म्हणजे प्रचारसभा, भाषणं, आणि आरोप-प्रत्यारोप करण हे आलंच. या सगळ्यावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेते गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून मतदारांना दोन साधे पण विचार करायला लावणारे प्रश्न विचारले आहेत. या पोस्टमुळे सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

गिरीश ओक यांचे दोन “भाबडे प्रश्न”

•एक पार्टी 1500 रुपये देतेय, दुसरी 3000 रुपये देणार म्हणतेय. बाकीही पैशांची बरीच आश्वासनं दिली जातायत. पण हे पैसे ते देतायत कुठून? आपल्या टोल, आयकर, जीएसटीमधूनच नं? मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी.

•एटीएम किंवा गाड्यांमधून पकडले जात असलेले पैसे नेहमीच 1 कोटी 27 लाख किंवा 2 कोटी 70 लाख असेच कसं असतं,हे पैसे देणारे कसे देतायत, आणि घेणारे असे कसे घेतायत हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांची मेहनत आहे का की पोचवणारेच काही लंपास करतायत किंवा पकडणारे काही भाग लंपास करून उरलेलेच दाखवतायत?”

गिरीश ओक यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानेही राजकीय परिस्थितीवर एक कविता सादर केली होती, जी चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली होती.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide