‘अग्नी’ हा देशातील पहिला अग्निशमन दलावर आधारित चित्रपट; 6 डिसेंबरला प्राइम व्हिडिओवर होणार प्रदर्शित!

204 0

साई ताम्हणकरसाठी हे वर्ष खूप खास ठरलं आहे. यावर्षी तिचे एकामागोमाग एक प्रोजेक्ट्स रिलीज झाले, तर काही नव्या प्रोजेक्ट्सच्या घोषणा देखील करण्यात आल्या. अलीकडेच ती ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती, आता ती ‘अग्नी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

कधी आणि कुठे पाहात येणार चित्रपट?

नुकताच ‘अग्नी’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये साई ताम्हणकरची एक दमदार झलक पाहायला मिळते. ‘अग्नी’ हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी ए
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून, हा देशातील पहिला सिनेमा आहे, जो अग्निशमन दलाच्या जीवनावर आधारित आहे.

चित्रपटातील स्टारकास्ट
‘अग्नी’चित्रपटामध्ये साई ताम्हणकरसह जितेंद्र जोशी, प्रतीक गांधी, सैयामी खेर, दिव्येंदू, आणि उदित अरोरा यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
टीझरमध्ये प्रतीक गांधी, सैयामी खेर, आणि जितेंद्र जोशी हे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत, तर दिव्येंदू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा अग्निशमन दलाच्या कठीण आणि धाडसी जीवनावर प्रकाश टाकतो आणि त्यांच्या निस्वार्थी सेवा दाखवतो.

काय म्हणाले निर्माते?

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी या सिनेमाच्या निर्मितीबाबत सांगितलं की, ‘अग्नी’ हा सिनेमा केवळ एका विभागाच्या कार्यावर आधारित नसून, त्यात मानवी भावना, संघर्ष, आणि नात्यांनाही महत्त्व दिलं आहे.

साई ताम्हणकरचा हा दमदार हिंदी चित्रपटात ‘अग्नी’ प्रेक्षकांच्या मनावर किती छाप पाडतो, हे पाहणं आता उत्चुकतेच ठरेल.

Share This News
error: Content is protected !!