मला आणि सुजयला राहुल गांधींनीच पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे यांचा मोठा गौप्यस्फोट

186 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी पाच दिवस शिल्लक असतानाच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक मोठं विधान चर्चेत आलं असून यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

2019 च्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेलो होतो त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्याला सुजय यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढावं अशी ऑफर दिली. जर राष्ट्रीय अध्यक्ष दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढा असं सांगत असेल तर त्या पक्षात राहायचंच कशाला असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला आणि सुजय विखे पाटलांना राहुल गांधींनीच पक्षा बहेर ढकललं असं म्हटलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोप केला आहे.

Share This News
error: Content is protected !!