‘पवार कुटुंबातील कटुता’…; पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांचं मोठं भाष्य

147 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना पवार कुटुंबातील फुटीसह राष्ट्रवादीतील पक्ष फुटीवरही अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी यावर सविस्तर बोलले असून पवार कुटुंबात पडलेली कटूता भविष्यातही मिटणार नाही असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

राजकारणामुळे निर्माण झालेली पवार कुटुंबातील कटूता भविष्यात दूर होईल का असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता त्यांनी यावर मला तसं वाटत नाही असं उत्तर दिलं आहे.

माझा सख्खा भाऊ माझ्यावर नाराज 

माझा सख्खा भाऊ माझ्यावर सध्या नाराज झाला आहे तो खूप टोकाचे बोलतोय नेमकं कशामुळे आणि काय हे मात्र कळायला मार्ग नाही असं म्हणत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे..

Share This News
error: Content is protected !!