जंगलात पोतं अन् पोत्यात सडलेल्या मृतदेहाचे सात तुकडे; मुंबईतील घटनेने परिसरात खळबळ

531 0

मुंबईत गोराई बीच परिसरातील जंगलात एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे एकूण 7 सापडले असून हे तुकडे सडलेल्या अवस्थेत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या रस्त्यावर शेफाली नावाच्या एका गावाजवळ काही दिवसांपासून दुर्गंधी पसरली होती. या दुर्गंधीमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यामुळे अखेर इथल्या नागरिकांनी दुर्गंधी मागचं कारण शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

एका मृतदेहाचे सात तुकडे

जवळच असलेल्या जंगलाच्या परिसरात झाडांच्या खाली नागरिकांना एक पोतं आढळलं. ज्यामध्ये चढलेल्या अवस्थेत मृतदेह भरून ठेवलेला होता. या ठिकाणी मृतदेह असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे पोतं उघडून पाहिलं असता त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरुन ठेवल्याचं आढळून आले. या मृतदेहाचे डोके, हात-पाय आणि धड वेगवेगळे करण्यात आले होते. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आल्याचं आढळून आलं आहे.

दरम्यान पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र गोराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!