महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे सात दिवस शिल्लक राहिले असतानाच आता महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार केला जातोय या पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभा होणार आहेत तर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या दोन सभा होणार आहेत.
288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजता चिमूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार असून दुपारी तीन वाजता सोलापुरात तर सायंकाळी सहा वाजता पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिसरी सभा होणार आहे.
यासोबतच विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दुपारी बारा वाजता बुलढाण्यातील चिखली मध्ये पहिली सभा होणार असून दुपारी साडेतीन वाजता गोंदियात दुसरी सभा होणार आहे.