विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून प्रचारासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठीची रणनीती आखली जात असताना आता भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्यानं माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानखुर्द शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक यांचं एक विधान चर्चेत आला आहे.
नवाब मलिक हे अणुशक्तीनगर ऐवजी मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढत असून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही निवडणुकीनंतर किंग मेकर च्या भूमिकेत असेल आमच्या शिवाय सरकार बनवणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.