नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचे उत्तर, पोलीस आयुक्तांनी दिला हा पुरावा

343 0

मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्यासोबत जेलमध्ये दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असाही आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. नवनीत राणांच्या त्या आरोपांना उत्तर देताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फूटेज शेअर केले आहे.

नवनीत राणा यांनी आपल्यासोबत जेलमध्ये दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप केला. या आरोपांची दखल घेत लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. नवनीत राणा यांना जेलमध्ये खरंच त्रास दिला जातोय का? आणि त्रास दिला गेला किंवा त्यांची गैरसोय झाली का? याबाबतचा अहवाल आता राज्य सरकारला लोकसभा सचिवालयाला पाठवावा लागणार आहे.

तत्पूर्वीच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. ‘आम्ही अजून काही बोलायचं का?’ असं एका वाक्यात उत्तर देऊन पोलिसांची भूमिकाच एक प्रकारे स्पष्ट केली आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये ?

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस ठाण्यात निवांतपणे बसलेले दिसत आहेत. पोलीस ठाण्यात राणा यांच्यासोबत एक महिला असून काही पोलीस कर्मचारी देखील दिसून येत आहेत. रवी राणा शांतपणे कॉफी पीत असून, नवनीत राणा कपातील कॉफी ढवळून पिताना दिसत आहेत.

नवनीत राणा यांच्या आरोपावर गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

खासदार नवनीत राणांनी कोठडीत त्यांनां हीन वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी स्वत: चौकशी केली आणि तसं काही घडलं अशी वस्तुस्थिती नाही. त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide