जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची थेट तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण; नाशिक कारागृहात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

653 0

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीने कारागृहातील कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड सलीम ऊर्फ पप्या शेख याने नाशिकरोड कारागृहातील तुरुंग अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड पप्या शेख (रा. कालिका नगर, शिर्डी, जि. अहिल्यानगर) व त्याच्या साथीदारांनी जून 2011 मध्ये शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पटणी यांचं खंडणीसाठी अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्याचबरोबर अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत त्यांचा निर्घृण खून केला. याप्रकरणी कुख्यात गुंड पाप्या शेख याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर त्याबरोबरच इतर बार जणांवर मोक्कासह अवैधरित्या शस्त्र तस्करी केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणी कुख्यात गुंड पाप्या शेख याची पुण्यातील कारागृहात परवानगी करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. याच कारागृहात शनिवारी सकाळच्या सुमारास कारागृह अधिकारी आणि अंमलदार हे कैद्यांच्या बॅरेकजवळ जवळ जाऊन कैद्यांची झडती घेत होते. त्यावेळी पाप्या शेख याने तुरुंग अधिक्षक (वर्ग १) जगदीश ढुमणेंसह अन्य तुरुंग अधिकार्‍यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी दुसरा कैदी तबरेज ऊर्फ तब्बू दरवेश खान याने स्वत: कडे लपवलेले धारदार कटर काढून स्वत:च्याच मानेवर वार करुन घेतले.

या घटनेनंतर दोघांवरही नाशिकरोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!