बिश्नोई गॅंगच्या टार्गेटवर पुण्यातील ‘हा’ मोठा नेता; पुणे पोलीस अलर्ट मोडवर

223 0

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलीस तात्काळ कामाला लागले. रात्रंदिवस या गुन्ह्याचा तपास सुरू असून आत्तापर्यंत तब्बल 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील चार आरोपी हे पुण्यातील आहेत. त्याचबरोबर आणखी अनेक आरोपी यामध्ये सहभागी असल्याची शक्यता देखील आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. मात्र या दरम्यानच मुंबई पोलिसांच्या तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली असून सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या टार्गेटवर पुण्यातील मोठा नेता होता, ही माहिती समोर आली आहे.

मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एका नेत्याला टार्गेट करण्यात येणार होते, असा दावा पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. आरोपींकडून करण्यात आलेल्या चौकशीत देखील सिद्दिकी यांच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाल्यास बिश्नोई गँगेच्या या आरोपींचा “प्लॅन बी” तयार होता. त्यानुसार हे शूटर्स पुण्यातील एका नेत्याला लक्ष्य करणार होते. मात्र या नेत्याचं नाव जाहीर करण्यात आलं नसून पुणे पोलिसांना मात्र त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पुणे पोलीस अलर्ट मोडवर

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करत असताना पोलिसांना बिश्नोई गँगच्या पुण्याच्या प्लॅन बी ची माहिती मिळाली. यामध्ये एका मोठ्या नेत्याचं नाव असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी हे नाव जाहीर केलं नाही. परंतु मुंबई पोलिसांनी याविषयीची माहिती पुणे पोलिसांना कळवली असून आता पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहे.

Share This News
error: Content is protected !!