लेकरांना जीवे मारण्याची धमकी.. आईवर केले अत्याचार; पुण्यातील स्वारगेट परिसरातील गंभीर घटना

511 0

मुलांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या आईवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार घटना पुण्यातील स्वारगेट परिसरात घडली आहे. हे घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीं विरोधात स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोहेल सबीक खान (वय, 20), कालू आबन खान (वय, 50) आणि दिलदार खाजू खान (वय, 27) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. पीडित महिला आणि तिचा पती कामानिमित्त पुण्यात आले होते. ते स्वारगेट परिसरातील एका खोलीत भाड्याने राहत होते. जून महिन्यात आरोपी सोहेलने महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर घाबरलेल्या महिलेला अत्याचारांबाबत कुठेही वाच्यता न करण्याची आणि तसे केल्यास तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा सोहेल आणि दुसरा आरोपी कालू यांनी देखील तिला धमकावून तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. यामुळे घाबरलेली महिला ही आपल्या मूळ गावी निघून गेली. त्यावेळी तिसरा आरोपी दिलदारने पीडित महिलेला फोन करून पोलिसांत न जाण्याची धमकी दिली.

दरम्यान घाबरलेल्या पीडित महिलेने आपल्या मूळ गावी आरोपींविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण स्वारगेट पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!