पैसा, गाडी, आलिशान घर… बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींना सूत्रधारांनी दिली ‘ही’ आमिषं

403 0

माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींना मुख्य सूत्रधारांकडून लाखोंची अमिषं दाखवण्यात आल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना मुख्य सूत्रधारांकडून ही आश्वासन देण्यात आली होती. त्या बदल्यातच हे आरोपी हत्त्येच्या कटात सहभागी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रुपेश मोहोळ (22), शिवम कोहाड (20), करण साळवे (19) आणि गौरव अपुणे (23) यांना 25 लाख रुपये रोख रक्कम, एक कार, एक फ्लॅट आणि दुबईला नेण्याचं आमिष दाखवलं होतं. तर आरोपी कनोजिया याला झीशान अख्तर (23) याच्याकडून पैसे मिळणार आहेत, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

आदित्य गुळणकर (22) आणि रफिक शेख (22, दोघेही रा. कर्वे नगर, पुणे) यांना 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हे दोन्ही आरोपी यापूर्वी अटक केलेल्या प्रवीण लोणकर आणि मोहोळ यांच्या संपर्कात होते. तर गुळणकर याला पुण्याजवळील खडकवासलाजवळ बंदुक चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. लोणकर आणि मोहोळ यांनी त्यांच्याकडे 9 एमएमचे पिस्तूल आणि राऊंड्स दिले होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणात देखील 9 एमएमची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!