मावळात ‘सांगली पॅटर्न’; अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना काँग्रेसनं देखील जाहीर केला पाठिंबा

378 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांनी जोर पकडला असताना आता पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघात सांगली पॅटर्न पाहायला मिळत आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार असणाऱ्या सुनील शेळके यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली.

सुनील शेळके यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं नाराज झालेल्या बापू भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

बापू भेगडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाचे मावळ तालुक्यातील नेते माजी राज्यमंत्री आणि मावळ तालुक्याचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी देखील आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत बापू भेगडे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असून आता काँग्रेस पक्षांनं देखील बापू भेगडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मावळ तालुक्यात आता सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!