काँग्रेस बंडखोरांचं सहा वर्षासाठी निलंबन; कोणत्या उमेदवारांवर झाली कारवाई?

103 0

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असताना अनेक पक्षांमध्ये बंडांना मोठं आलं आहे. बहुतांश ठिकाणातील बंड मागे घेण्यात राजकीय पक्षांना यश आलं असलं तरी अनेक ठिकाणी मात्र बंडोबा निवडणूक लढण्यावर ठाम होते.

काही दिवसांपूर्वी भाजपानं आपल्या 40 बंडखोर उमेदवारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आज काँग्रेस पक्षानं आपल्या बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे.

पुढील सहा वर्षासाठी या बंडखोर उमेदवारांवर कारवाई करत असल्याचे माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी यांनी दिली आहे.

कोणत्या बंडखोर उमेदवारांवर निलंबनाची कारवाई?

काटोल: याज्ञवल्क्य जिचकार,

रामटेक: राजेंद्र मुळक

पर्वती: आबा बागुल

कसबा: कमल ज्ञानराज व्यवहारे

सांगली: जयश्री पाटील

शिवाजीनगर: मनीष सुरेंद्र आनंद

Share This News
error: Content is protected !!