थोपटेवाडी येथील रेल्वे गेट बुधवारी २४ तास वाहतुकीसाठी बंद राहणार

415 0

नीरा – पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट बुधवारी दिवसभर वाहतुकीसाठी २४ तास बंद राहणार आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

पुरंदर तालुक्यातील पुणे – पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी बुधवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ६ ते गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव – जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!