स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणीला त्याने रूमवर बोलावलं अन्..; पोलिसांनी दाखल केले गुन्हे

409 0

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ? असा प्रश्न पडण्यासारख्या अनेक घटना गेल्या काही वर्षांपासून पुण्यात घडत आहेत. महिला अत्याचारांचं प्रमाण प्रचंड वाढला असून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणी बरोबर हा गंभीर प्रसंग घडला आहे. या तरुणीची ओळख एका तरुणासोबत झाली होती. या दोघांची चांगली मैत्री असल्याने आरोपी तरुणाने तरुणीकडे प्रेमाची कबुली देत लग्नासाठी विचारणा केली. त्यानंतर तिला भाड्याने घेतलेल्या रूमवर नेऊन लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार तब्बल चार वर्ष सुरू होता. त्यानंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने पोलीस ठाणं गाठून तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार विश्रामबाग पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या चार मित्रांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2020 ते 2024 दरम्यान घडला. आरोपी तरुणाने तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून एका रूमवर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या तरुणीने आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीच्या मित्रांनी रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. त्यानंतर तरुणीने लग्नाची मागणी लावून धरल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्याचबरोबर लग्नाला थेट नकार देत तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नाही तर या आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तरुणासह त्याचे मित्रां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!