राज्यात सुरु असलेल्या भारनियमनाविरोधात पुण्यात मनसेचं आंदोलन

412 0

वीजप्रश्नावरून पुण्यात मनसे  आक्रमक झाली आहे. आज मनसेने महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भारनियमन आणि सिक्युरिटी डिपॉझिटचा मनसेने यावेळी विरोध केला.

पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं असून शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

यावेळी मनसे नेते बाबू वागसकर,किशोर शिंदे,पुणे महिला शहरध्यक्षा वनिता वागसकर आदी उपस्थित होते

Share This News
error: Content is protected !!