ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आज करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून महायुतीत आतापर्यंत 215 जागांची घोषणा झाली आहे. युतीतील तीनही पक्षांकडून विधानसभेची विशेष तयारी केली जात असतानाच आज रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या संजना दानवे-जाधव या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आज सायंकाळी संजना जाधव या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली असून त्या कन्नड सोयगाव या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.