मेडिकलमध्ये तरुणीचा विनयभंग; चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील धक्कादायक घटना

625 0

वरोरा शहरात पुन्हा एक विनयभंगाची घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे. ही घटना मेडिकल स्टोअर मध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत घडली.

शहराच्या मध्यभागी आंबेडकर चौकात असलेल्या एका मेडिकल स्टोअर्स मध्ये ही घटना दोन दिवसापूर्वी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार असे कळते, की या मेडिकल स्टोर मध्ये एक तरुणासह एक महिलाही काम करते. या मेडिकल दुकानाला लागूनच स्टोर रूम आहे. या स्टोर रूमला मधून सामान आणण्यासाठी काल या तरुणीला पाठवण्यात आले. तिच्या मागे जाऊन या तरुणाने तिचा विनयभंग केला. त्यामुळे ही तरुणी घाबरून गेली. बाहेर येऊन तिने या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला केली.
घटना घडल्याचे कळताच शहरात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरेने हालचाल करत पोलिसांनी आरोपीस छोटू गाडगे याला शहरातील एका बियर बार मधून अटक केली.

पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरकार हे घटनेची चौकशी करीत आहेत

Share This News
error: Content is protected !!