भाजपची दुसरी यादी जाहीर; कसब्यातून रासने, खडकवासल्यातून तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळेंना पुन्हा उमेदवारी

75 0

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून तीन उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून खडकवासल्यातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मधून विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

कुणाला कुठून उमेदवारी ?

1. धुळे ग्रामीण- राम भदाणे
2. मलकापूर- चेनसुख संचेती
3. अकोट- प्रकाश भारसाकले
4. अकोला पश्चिम- विजय अग्रवाल
5. वाशिम- श्याम खोडे
6. मेळघाट- केवलराम काळे
7. गडचिरोली- मिलिंद नरोटे
8. राजुरा- देवराव भोंगळे
9. ब्रह्मपुरी- कृष्णलाल सहारे
10. वरोरा- करण देवतले
11. नाशिक मध्य- देवयानी फरांदे
12. विक्रमगड- हरिश्चंद्र भोये
13. उल्हासनगर- कुमार आयलानी
14. पेन- रवींद्र पाटील
15. खडकवासला- भीमराव तापकीर
16. कसबा पेठ- हेमंत रासने
17. पुणे कॅन्टोन्मेंट- सुनील कांबळे
18. लातूर ग्रामीण- रमेश कराड
19. सोलापूर शहर मध्य- देवेंद्र कोठे
20. पंढरपूर- समाधान आवताडे
21. शिराळा- सत्यजित देशमुख
22. जत- गोपीचंद पडळकर

अशा एकूण 22 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. पुण्यातील कोणतेही उमेदवार भाजपने बदललेले नसून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर हेमंत रासने हे कसबा पोट निवडणुकीत पराभूत होऊनही पुन्हा एकदा त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide