धर्माबाबत असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको – शरद पवार

492 0

राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कुणीही जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यात बोलताना दिली.

राज्यात वीज टंचाईची समस्या नागरिकांना जाणवत आहे . त्यामुळे विरोधी पक्ष हे आक्रमक झाले आहेत त्यावर केवळ महाराष्ट्रात वीज टंचाई नाही.कर्नाटक मध्ये पण टंचाई आहे. मागणी वाढल्यामुळे हा तुटवडा आहे..विशेष करून शेतीसाठी वीज जास्त वापरली जात आहे .अश्यात केंद्र आणि राज्यांनी विचार करून प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे . असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली असून किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर दिल्लीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide