माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारताचे माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माधव गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्.डी. केली.
दरम्यान, डॉ. गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी अमेरिकेतील प्रसिध्द विल्यम्स महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएचडी ची पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर 1959 मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च 1993 मध्ये भारत सरकारच्या गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्त घेतली.
