चंद्रकांत पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

118 0

राज्यात विधानसभा निवडणूक घोषणा झाली असून सर्वच पक्ष तयारी करत असताना आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य आणि वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आपला नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

2019 पाठोपाठ चंद्रकांत पाटील यांना दुसऱ्यांदा कोथरूड विधानसभेतून भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या रॅलीत कोथरुडकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य कोथरुडकर मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. कोथरूड मधून नामदार चंद्रकांतदादा पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा शपथ घेणार असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवीजी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खा. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपकभाऊ मानकर, आ. भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोथरुड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडीमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कोथरूडकर जनतेने भारतीय जनता पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी बनवले. त्यामुळे आजच्या रॉलीला मिळालेला प्रतिसाद पाहून कोथरुड विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Share This News
error: Content is protected !!