विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार

94 0

आज शाळेला आवश्यक असलेली कपाटे भेट देत आहोत मात्र लवकरच विपरीत परिस्थितीत असूनही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.

भोर जवळील करंदी आणि वाढाणे गावांच्या मध्ये असलेल्या येसाजी कंक माध्यमिक विद्यालयात नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट, क्रिएटिव्ह फाउंडेशन व कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने शालेय साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी खर्डेकर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उमेश भेलके,मुख्याध्यापिका भारती खटाटे, शिक्षक सोपान शिंदे, प्रतिष्ठान चे संदीप मोकाटे, किरण उभे, मिलिंद सातपुते, नवनाथ शिंदे,नवनाथ तनपुरे इ उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर व बुटांची गरज असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका भारती खटाटे व शिक्षक सोपान शिंदे यांनी सांगितले.
ज्यांना खरी गरज आहे अश्यांचा शोध घेऊन त्यांच्या पर्यंत आवश्यक ती मदत पोहोचविण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन सतत प्रयत्नशील असते असे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
येथील शिक्षक ही रोज 25 किमी प्रवास करून शिकवायला येतात याचे महत्व ओळखा आणि आयुष्यात यशस्वी होऊन आपल्या शिक्षकांना गुरुदक्षिणा द्या असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी वेगळ्या वाटा चोखाळा आणि शिक्षण अर्धवट सोडू नका, तुम्हाला जी मदत लागेल ती नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन नक्कीच करेल असेही संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.
कोथरूड नवरात्र उत्सवाच्या वेळी विविध सामाजिक संस्थांना मदत करणार असल्याचे आम्ही जाहीर केले होते त्यानुसार ही मदत देत आहोत असे कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके म्हणाले.
येथील विध्यार्थ्यांना लागणारे स्वेटर व बूट ही लवकरच उपलब्ध करू असे नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मनोज हिंगोरानी यांनी स्पष्ट केले.

Share This News
error: Content is protected !!