Raj Thackeray

आधी 45 आता 13: उमेदवारांचे घोषणा; मनसेची उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

264 0

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे भाजपाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्या त म्हणून शिंदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत 83 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या सोबतच महाराष्ट्रात सर्वप्रथम उमेदवार देण्यात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही नुकतीच 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यानंतर आज पुन्हा 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

तेरा उमेदवारांमध्ये कोणाचा समावेश?
अमरावती – पप्पू उर्फ मंगेश पाटील
नाशिक पश्चिम – दिनकर धर्माजी पाटील
अहमदपूर-चाकूर – नरसिंग भिकाणे
परळी – अभिजित देशमुख
विक्रमगड – सचिन रामू शिंगडा
भिवंडी ग्रामीण – वनिता शशिकांत कथुरे
पालघर – नरेश कोरडा
शहादा – आत्माराम प्रधान
वडाळा – स्नेहल सुधीर जाधव
कुर्ला- प्रदीप वाघमारे
ओवळा-माजिवडा – संदीप पाचंगे
गोंदिया – सुरेश चौधरी
पुसद – अश्विन जयस्वाल

Share This News
error: Content is protected !!