Breaking News

माजी आमदार अनिल गोटे ठाकरे गटात प्रवेश करणार

111 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून महाराष्ट्र 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

सर्वच पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करत असताना आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून माजी आमदार अनिल गोटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत अनिल गोटे?

अनिल गोटे यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली पुढे 2009 पासून 2019 पर्यंत ते धुळे शहरातून आमदार म्हणून विजयी झाले होते मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला.

Share This News
error: Content is protected !!