राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी असताना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.
कल्याण डोंबिवली मध्ये राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केलं यावेळी त्यांनी या दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.
विद्यमान आमदार राजू पाटील यांना कल्याण डोंबिवली ग्रामीण मतदार संघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आले असून अविनाश जाधव यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण पुन्हा येणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
आज किंवा उद्या मनसेची दुसरी यादी जाहीर होणार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने याअगोदर सात उमेदवारांची घोषणा केली असून आज किंवा उद्या मनसेची उमेदवारांची यादी जाहीर होईल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलेला आहे.
या अगोदर जाहीर झालेले मनसेचे सात उमेदवार कोण?
1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर