Ajit Pawar

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिला ‘या’ उमेदवाराला दिला पहिला ‘एबी’ फॉर्म;

82 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत नुकतीच भाजपाचे 99 उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली होती. आतापर्यंत भाजपाचे 99 वंचित बहुजन आघाडीचे 67 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात आणि परिवर्तन महाशक्तीचे आठ उमेदवार जाहीर झाले आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचा अधिकृत पहिला एबी फॉर्म वितरित करण्यात आला असून  भारत गावीत यांना हा एबी फॉर्म मिळाला आहे.

भारत गावित हे नवापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक हे आमदार आहेत. 2019 ची विधानसभा निवडणूक ही भारत गावित यांनी भाजपाकडून लढवली होती. या निवडणुकीत 58,579 मतं मिळवत ते तिसऱ्या क्रमांकावर होते.

Share This News
error: Content is protected !!