पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभेसाठी सर्व पक्ष तयारी करत असताना नुकतीच भारतीय जनता पक्षाची 99 उमेदवारांची, वंचित बहुजन आघाडीचे 67 उमेदवारांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सात उमेदवारांची यादी जाहीर झाली.
अशातच आज परिवर्तन महाशक्तीनं पुण्यात पत्रकार परिषद घेत आपल्या आठ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर शिरोळ आणि मिरज या दोन जागांवरील उमेदवारांची घोषणा उद्या होणार आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.
परिवर्तन महाशक्तीकडून कुणाला मिळाली उमेदवारी?
- बच्चू कडू – अचलपूर विधानसभा
- अनिल चौधरी – रावेर यावल विधानसभा
- गणेश निंबाळकर – चांदवड
- सुभाष साबणे – देगलूर बिलोली
- अंकुश कदम – ऐरोली विधानसभा
- माधव देवसरकर – हदगाव हिमायतनगर विधानसभा
- गोविंदराव भवर – हिंगोली विधानसभा
- वामनराव चटप – राजुरा विधानसभा