राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्वच पक्ष तयारी करत असतानाच आता पुणे जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून पुणे जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळ पार पडला.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माऊली कटके हे विधानसभा लढण्यास इच्छुक होते. अशातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने अजित पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.