Manoj Jarange

ठरलं! मनोज जरांगे पाटील उमेदवार उभे करणार पण…

91 0

निवडणूक लढवायची की उमेदवार पाडायचे यासाठी म्हणून जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत सकल मराठा समाजाची बैठक बोलावले होते या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

एसी आणि एसटी मतदार संघात उमेदवार द्यायचे नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं असून ज्या जागेवर आपला उमेदवार निवडून येऊ शकतो त्याच ठिकाणी उमेदवार द्यायचे असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला आहे.

अन्य ठिकाणी आपल्या विचारांचा उमेदवार असेल त्याला पाठिंबा देऊ. ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा असेल असं लेखी लिहून घेऊ. आपल्या सर्व उमेदवारांनी फॉर्म भरून ठेवा असं म्हणत जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

 

Share This News
error: Content is protected !!