भाजपा 155 जागा; तर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या वाट्याला किती जागा?; अमित शहा यांच्यासोबत बैठकीत काय झाली चर्चा

78 0

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असताना राजधानी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या समवेत तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा झाली आहे.

ही बैठक झाल्यानंतर महायुतीचा एक संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.

या फॉर्म्युल्यानुसार महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना या निवडणुकीत भाजपा 155 ते 160 जागा लढवेल अशी माहिती समोर आले असून शिंदेंच्या शिवसेनेला 60 ते 65 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 55 ते 60 जागा मिळतील अशी माहिती समोर आली आहे.

जागावाटपावर आम्ही तीनही नेते एकत्र बसून निर्णय जाहीर करू

येत्या दोन ते तीन दिवसात महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघे एकत्र बसून जागा वाटपासंदर्भातून निर्णय जाहीर करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अमित शहा यांच्या समवेतची बैठक संपल्यानंतर अजित पवार हे आपल्या पूर्वनियोजित नाशिक दौऱ्यासाठी रवाना झाले यवेळी त्र्यंबकेश्वर मध्ये अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ही माहिती दिली.

Share This News
error: Content is protected !!