Breaking News

ज्येष्ठ संस्कृततज्ञ पंडित वसंत अनंत गाडगीळ यांचं निधन

191 0

भारतीय सांस्कृतिक अभ्यासातील प्रतिष्ठित विद्वान व्यक्तिमत्व पंडित वसंतराव गाडगीळ  यांचे आज (18 ऑक्टोबर) पहाटे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा त्यांनी प्रवास केला होता. पं. वसंत गाडगीळ यांनी प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषीपंचमी निमित्त ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्याने विधायक कार्य करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार ते घडवून आणत. ते संस्कृत भाषे विषयी नेहमी आग्रही असत. ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत.

 

 

Share This News
error: Content is protected !!