Crime

धक्कादायक! इंस्टाग्राम वर ची ओळख तरुणीला पडली महागात; गुंगीचे औषध टाकून वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार

528 0

सध्या सोशल मीडियावर तरुण-तरुणीचे ऑनलाइन बोलण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.परंतु सोशल मीडीयाच्या माध्यमातून गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने 20 वर्षाच्या तरुणीवर कोल्ड्रिंग मध्ये गुंगीचे औषध घालून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुजरातमध्ये राहणाऱ्या राहणाऱ्या मितुल दिलीप परमार याच्या विरुद्ध आयपीसी IPC 376, 376/2एन, 366 सह पोक्सो ॲक्ट (POCSO Act) आणि आयटी ॲक्ट नुसार (IT Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत वडगाव बुद्रुक मध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिली आहे. हा प्रकार मार्च 2018 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत पुण्यात आणि आरोपीच्या गुजरात येथील घरात घडला आहे. पीडीत तरुणीच्या तक्रारीवरुन मितुल परमार (वय-25 रा. गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भारती विद्यपीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी आणि आरोपीची ओळख इंन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झाली होती.आरोपीने तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेत तिला कोल्ड्रिंग मधून गुंगीचे औषध दिले.तरुणी बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला तसेच त्याचा व्हिडीओ तयार करुन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले.यानंतर त्याने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्याच्या उद्देशाने गुजरातला बोलावून घेतले. त्यामुळे आरोपीने पीडित तरुणी सोबत लग्न करुन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकवेळा शरीर संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Share This News
error: Content is protected !!