पुणे जिल्हा दक्षिणच्या लाभार्थी संयोजकपदी शैलेंद्र ठकार

93 0

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विशेष रणनीती आखत असताना पुणे जिल्हा दक्षिण लाभार्थी संयोजक म्हणून शैलेंद्र ठकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान हे अभियान चालणार आहे.

शैलेंद्र ठकार हे पुरंदर तालुक्यातील सासवडचे रहिवाशी असून बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.

संघ रचनेत शाखा मुख्य शिक्षक ते जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख, प्रचार प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या शैलेंद्र ठकार यांनी सांभाळल्या असून अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोमच्या पुणे विभाग संयोजक पदाची जबाबदार त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. मागील वर्षापासून शैलेंद्र ठकार भाजपाच्या पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide