पुण्यातील टेकड्या बनल्या “हॉटस्पॉट”, दररोज लूटमार आणि छेडछाडीच्या घटना समोर

193 0

संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणारं बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण झाल्यानंतर पुण्यातील असुरक्षित टेकड्यांचा आणि घाट रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर पुण्यातील विविध टेकड्यांवर लूटमारीच्या, हाणामारीच्या आणि छेडछाडीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांसाठी टेकड्या हा नवा “हॉटस्पॉट” बनला आहे. अशीच एक घटना बाणेर टेकडी परिसरातही घडली.

बाणेर टेकडी परिसरात टोळक्याकडून दोघांना मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सव्वा चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतुः शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार पीडित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. ही तरुणी आपल्या मित्राबरोबर टेकडी परिसरात फिरायला गेली होती. मी त्यावेळी दोन अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. धारदार शस्त्राने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत या दोघांकडे असलेला तब्बल 51 हजारांचा ऐवज लुटून नेला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी पसार झाले.

एसबी रोड टेकडीवरही लुटमार

बाणेर परिसरात घडलेल्या घटनेप्रमाणेच सेनापती बापट रस्त्यावरील टेकडीवरही दोघांना चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी साईराज भांड (वय 19, रा. नाना पेठ) या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 5 ऑक्टोबर रोजी साईराज हा त्याचा मित्र अथर्व याच्यासोबत दुपारच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीजवळ मित्राची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत साईराजकडील 70 हजारांची सोनसाखळी चोरून नेली.

टेकड्या बनल्या “हॉटस्पॉट”

तळजाई टेकडी, हनुमान टेकडी, पर्वती, पाषाण रस्ता, गोखलेनगर परिसरातील टेकड्यांवर यादीतील घटना घडल्या आहेत. त्यातच आता जाणून बसून तरुण तरुणींना गाठून त्यांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याचबरोबर मुलींची छेड काढण्याच्या घटनाही वाढलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वच टेकड्यांच्या परिसरात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!