नवी दिल्ली: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्याचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं मात्र या प्रश्नाचे उत्तर आज अखेर मिळालं असून 288 विधानसभा मतदारसंघासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडेल.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनच्या ‘प्लॅनरी हॉल’ हॉलमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार घेतली.
महाराष्ट्रात एकूण नऊ कोटी तीन लाख मतदार असून यापैकी चार कोटी 93 हजार पुरुष मतदार तर चार कोटी 66 हजार महिला मतदार आहेत. तर 18 लाख 67 हजार नवमतदार आहेत.
कधी होणार निवडणूक?
एका टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे 20 नोव्हेंबर 2024 ला निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
कोणत्या विभागात किती मतदार संघ
एकूण मतदार संघ = 288
- विदर्भ = 62
- खानदेश =47
- कोकण,ठाणे =39
- पश्चिम महाराष्ट्र = 58
- मराठवाडा = 46
- मुंबई =36
2019 मधील कसं होतं पक्षीय बलाबल?
भाजपा 105
शिवसेना 56
राष्ट्रवादी 54
काँग्रेस 44
बहुजन विकास आघाडी 03
समाजवादी पार्टी 02
एआयएमआयएम 02
मनसे 01
शेतकरी कामगार पक्ष 01
भारतीय कम्युनिस्ट पार्टी 01
राष्ट्रीय समाज पक्ष 01
स्वाभिमानी 01
क्रांतिकारी पक्ष 01
अपक्ष 13
पक्षफुटीनंतर कसं होतं पक्षीय बलाबल?
भाजपा 105
काँग्रेस 44
राष्ट्रवादी अजित पवार 42
राष्ट्रवादी शरद पवार 12
शिवसेना एकनाथ शिंदे 40
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 16