ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…; महायुतीचे ‘हे’ 7 नेते झाले आमदार

137 0

मुंबई: राज्यात अवघ्या एक तासात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असतानाच आज राज्यपाल नियुक्त सात विधानसभा सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. 

भाजपाकडून तीन राष्ट्रवादी कडून दोन आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन नेत्यांची वर्णी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून लागली आहे.

भाजपाकडून महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज राठोड राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इंद्रीस नायकवडी तर शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे आदी नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा संभाव्य जाहीरनामा ‘TOP NEWS मराठी’च्या हाती; कोणत्या असणार महत्त्वाच्या घोषणा?

बिगुल वाजणार; आज होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा

Share This News
error: Content is protected !!