ठाण्यातील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या.
त्यातच आता गुजराती समाजाने मुंबईत बॅनर्ल लावत राज ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलं आहे. पण भोंग्याबाबत झालेल्या वादावरुन राज्य सरकार आता पुर्णपणे तयारीत आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्बायाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी राज्य सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे.
लाउडस्पीकर विवाद को सुलझाने के लिए राज्य सरकार द्वारा बुलाई गई सर्वदलीय बैठक में MNS प्रमुख राज ठाकरे शामिल नहीं होंगे: MNS नेता संदीप देशपांडे, महाराष्ट्र
(फाइल फोटो) pic.twitter.com/wbKk5Dr4cG
— ANI_HindiNews (@AHindinews) April 25, 2022
या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.
या बैठकीला राज जरी उपस्थित राहणार नसले तरी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई मनसेच्यावतीने उपस्थित राहणार आहेत.
लाउडस्पीकर विवाद को सुलझाने के लिए राज्य सरकार द्वारा बुलाई गई सर्वदलीय बैठक में MNS नेता संदीप देशपांडे, बाला नंदगांवकर और नितिन सरदेसाई शामिल होंगे।
— ANI_HindiNews (@AHindinews) April 25, 2022