काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांना 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाई केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई केली आहे.
आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
रविवार 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आमदार खोडके अधिकृतपणे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.
आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे