फास्ट बॉलर मोहम्मद सिराजची DSP पदी वर्णी; पोलिसांतील या नोकरीसाठी किती मिळणार पगार ? 

214 0

भारताचा वेगवान गोलंदाज आणि मिया भाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारने मोठं गिफ्ट दिलं. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेपूर्वी भारत सरकारच्या खेळाडू कोट्यातून सिराज ला पोलीस उपाधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारत सरकारच्या खेळाडू कोट्यातून नेहमीच देशासाठी खेळात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी मिळते. त्याचप्रमाणे भारताचा फास्ट बॉलर सिराजला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे. त्याने शुक्रवारी उपअधीक्षकपदाची सूत्रं स्विकारली. त्यानंतरचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शुक्रवारी मोहम्मद सिराजने तेलंगणा पोलीस महासंचालकांना रिपोर्ट केल्यानंतर पोलीस उपअधीक्षकपदाचा भार स्विकारला. 2024 चा टी-20 वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर तेलंगणा सरकारने सिराजला जमिनीसह सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिलं होतं. हेच आश्वासन आता सरकारने पूर्ण केलं.

पगार किती मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सिराजला उपअधीक्षकाच्या पदासाठी मोठी रक्कम पगार म्हणून मिळणार आहे. तेलंगणा पोलीस विभागात उपअधीक्षक पदाची वेतनश्रेणी 58 हजार 850 रुपये ते 1 लाख 37 हजार 50 रुपये आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा पगार सिराज ला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सरकारी नोकरीमध्ये मिळणारे इतर लाभ जसे की घरभाडं भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता असे इतर भत्ते देखील मिळणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!