दसरा मेळावा आणि राजकीय टोलेबाजी: महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार चार दसरा मेळावे

151 0

राज्यात विजयादशमी अर्थात दसऱ्याची जय्यत तयारी होत असतानाच या दसऱ्याचं महाराष्ट्रात आणखी एक वैशिष्ट्य आहे ते अर्थातच दसरा मेळावा. आतापर्यंत भगवान भक्ती गडावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत होता.

मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा सुरू झाला आणि राज्यात तीन दसरा मेळावे होऊ लागले अशातच आता यावर्षी मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा आयोजित केल्याने यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच चार दसरा मेळावे होणार आहेत.

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव या ठिकाणी होणार असून राज्याचे कृषिमंत्री व पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत धनंजय मुंडे यांच्या सोबतच ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायण गडावर होणार असून  जरांगे पाटील नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवतीर्थ  शिवाजी पार्कवर होणार आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!