राज्यात अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाचणार आहे सर्वच पक्ष मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करत असताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्र मध्ये विधानसभेचे एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून या 288 मतदारसंघांमध्ये सद्यस्थिती काय आहे कोणत्या पक्षांचे आमदार आहेत मागील निवडणुकांमध्ये या मतदार संघातील गणित नेमकी कशी राहिली होती यावरचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम चर्चा विधानसभेची आढावा मतदार संघाचा.
चर्चा विधानसभेचे आढावा मतदार संघाचा या विशेष कार्यक्रमांमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील 202 क्रमांकाचा मतदारसंघ पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघात काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार आहेत 2009 14 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील लढती कशा झाल्या होत्या आणि कुणाचा विजय झाला होता पाहूयात
-
2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विजय शिवतारे विरुद्ध राष्ट्रवादीचे दिगंबर दुर्गाडे अपक्ष म्हणून संजय जगताप आणि जनता दलाकडून दादा जाधवराव निवडणुकीच्या रिंगणात होते.
-
या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा 67,998 मतांनी विजय झाला होता
-
राष्ट्रवादीच्या दिगंबर दुर्गाडे यांना 44,529 इतकी मतं मिळाली होती
-
अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या संजय जगताप यांना 33,513 इतकी तर जनता दलाकडून निवडणूक लढवणाऱ्या दादा जाधवराव यांना 14,050 इतकी मतं मिळाली होती.
-
2014 मध्ये राज्यात युती व आघाडी तुटल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजय शिवतारे, काँग्रेसकडून संजय जगताप, राष्ट्रवादीकडून अशोक टेकवडे तर भाजपाकडून संगीतादेवी राजेनिंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
-
या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारेंना 82,339 मतं मिळाली होती. आणि त्यांचा विजय झाला होता
-
काँग्रेसच्या संजय जगताप यांना 73,749 मतं मिळाली होती
-
राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे माजी आमदार अशोक टेकवडे यांना या निवडणुकीत 28,067 मतं मिळाली होती
-
भाजपाकडून निवडणूक लढवणाऱ्या संगीता देवी राजेनिंबाळकर यांना अवघी 18918 इतकी मतं मिळाली होती
-
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून विजय शिवतारे तर काँग्रेस कडून संजय जगताप निवडणुकीच्या रिंगणात होते.
-
या निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी 1 लाख 30 हजार 710 मतं मिळवत विजय मिळवला होता
-
शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना या निवडणुकीत 99,306 इतकी मतं मिळाली होती
आता आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुती मधील तीनही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला असून महाविकास आघाडीमध्येही काँग्रेसच्या संजय जगताप यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संभाजी झेंडे यांचं आव्हान आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल..